[mumbai] - उद्धव ठाकरे - छगन भुजबळ यांच्यात चांगल्या गप्पा रंगतात तेव्हा...

  |   Mumbainews

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची मुंबईत एका खासगी सोहळ्यात भेट झाली आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झडत आहे. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त पद्मनाभन यांच्या मुलाच्या लग्नात या दोन नेत्यांची भेट झाली. वरळीत मे फेअर इथे हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भुजबळ ठाकरे यांच्यात बराचवेळ चर्चा रंगली. या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

छगन भुजबळ आणि उद्धव ठाकरे यांच्यात चांगल्या गप्पा रंगल्यामुळे राजकीय तर्कांनाही उधाण आलेय. या दोघांची भेट आणि त्यांच्यात रंगलेल्या गप्पा हा राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त पद्मनाथन यांच्या मुलाचे लग्न मुंबईत पार पडले. या लग्नात या दोन्ही नेत्यांसह सगळ्याच दिग्गज नेत्यांची हजेरी होती. मात्र चर्चा रंगली ती उद्धव ठाकरे आणि छगन भुजबळ यांच्या भेटीचीच. उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना खासदार संजय राऊतही होते. या दोघांनी कोणत्या विषयावर गप्पा मारल्या हे अद्याप गुलदस्त्यात आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/objLQwAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬