[mumbai] - पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणी कर्नाटक एसआयटी करणार कळसकरची चौकशी

  |   Mumbainews

मुंबई: पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणी शरद कळसकरच्या चौकशीचीही शक्यता आहे. कर्नाटक एसआयटीची टीम महाराष्ट्राकडे रवाना झालीय. दाभोलकर हत्याप्रकरणी जप्त केलेल्या मोटरसायकलींची पाहणी करण्यात येणार आहे. दाभोलकर आणि लंकेश हत्येसाठी एकाच दुचाकीचा वापर केल्याचा पोलिसांचा संशय आहे. कळसकरकडून जप्त केलेली दुचाकी लंकेश हत्याप्रकरणात वापरल्याची कर्नाटक एसआयटीला माहिती मिळालीय. त्यावरून ही चौकशी करण्यात येणार आहे.

नालासोपारा स्फोटकं प्रकरणी एटीएसच्या अटकेत असलेल्या शरद कळसकर, वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर आणि श्रीकांत पांगरकर यांची कोठडी आज संपत असून, आज या चौघांना करणार कोर्टात हजर केलं जाणार आहे. नालासोपारा स्फोटकं प्रकरणी वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकरला १० ऑगस्टला तर श्रीकांत पांगारकरला त्यानंतर अटक करण्यात आली होती. शरद कळसकरने डाक्टर नरेंद्र दाभोळकर प्रकरणी आपला हात असल्याच मान्य केल्यानंतर सीबीआय त्याचा ताबा मागण्याची शक्यता आहे. सोबतच चौघांच्या तपासात कोणत्या बाबी समोर आल्या त्याचा एटीएस कोर्टात खुलासा करू शकते....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/znMglgAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬