[nagpur] - अमित रामटेकेची हत्या दहशतीतून

  |   Nagpurnews

नागपूर : खंडणी न दिल्याने गुन्हेगार अमित रामटेके हा आपल्याला ठार मारेल, या भीतीमुळे त्याची हत्या केल्याचे अटकेतील मारेकऱ्यांनी पोलिसांनी सांगितले. अमित याच्या हत्येप्रकरणात हुडकेश्वर पोलिसांनी शैलेश हरीराम गुलानी व कार्तिक पुरुषोत्तम धार्मिक या दोघांना अटक केली आहे. दोघांना सोमवारी पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची ३१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.

दरम्यान, टेका येथील अरमान अन्सारी (वय २५ रा.म्हाडा कॉलनी, जरीपटका) याच्या हत्येप्रकरणात पाचपावली पोलिसांनी जुबेर शेख (वय ३२) त्याचा भाऊ वसीम शेख(३४) व त्याचे वडील नसीम शेख (वय ६०,सर्व रा. जरीपटका) या तिघांना अटक केली. तिघांची १ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी घेण्यात आली आहे. पाचपावली पोलिसांनी उशिरा रात्री या प्रकरणात अन्य तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/Q3a5twAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬