[nagpur] - ट्रॉमात ब्लड स्टोरेज युनिट सेवेत
अपघाती रुग्णांसाठी सोय
म. टा. प्रतिनिधी, नागपूर
लोकलेखा समितीने दोन महिन्यांपूर्वी ऐन पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) कान टोचले. त्यानंतर उशिरा का होईना, ट्रॉमा केअर सेंटरमध्ये अखेर रक्तसंग्रहण केंद्र (ब्लड स्टोरेज युनिट) सेवेत दाखल झाले आहे. त्यामुळे अपघाती रुग्णांच्या नातेवाइकांची आता ऐनवेळी होणारी धावपळ थांबू शकेल.
अपघातग्रस्त रुग्णांना अनेकदा रक्ताची गरज भासते. मेडिकलमधील ट्रॉमा सेंटरमध्ये उपचाराची अद्ययावत सोय असली तरी येथे रक्तपेढी किंवा रक्त संग्रहण केंद्र नव्हते. त्यामुळे येथे रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास नातेवाइकांना मेडिकल, सुपर वा खासगी रक्तपेढीपर्यंत धावपळ करावी लागत होती. लोकलेखा समितीने ट्रॉमा केअर सेंटरच्या निरीक्षणात या गंभीर विषयावर बोट ठेवत प्रशासनासह वैद्यकीय सचिवांची कानउघाडणी केली होती. त्यानंतर मेडिकलकडून तातडीने ट्रॉमाच्या रक्त संग्रहण केंद्राचे काम हाती घेण्यात आले. गेल्या आठवड्यात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मंजुरी मिळाल्यानंतर अखेर ते आता सेवेत दाखल झाले आहे. ट्रॉमाच्या पहिल्या मजल्यावरील या केंद्रात मेडिकलच्या मॉड्युलर रक्तपेढीतून नित्याने रक्ताच्या पिशव्या आणून संग्रहित होणार आहेत. त्या गरजेनुसार आता नातेवाइकांना उपलब्ध केल्या जात आहे. सद्यस्थितीत ट्रॉमाला रोज १० ते १२ रक्तपिशव्यांची गरज भासते. रक्त संग्रहण केंद्र सुरू झाल्याने रुग्णांना वेळीच रक्त मिळत असल्याचा दुजोरा मेडिकलच्या रक्तपेढीचे प्रमुख डॉ. संजय पराते यांनी दिला....
येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/9FwNkQAA