[nagpur] - बिडगाव ग्रा. पं. चा अनागोंदी कारभार

  |   Nagpurnews

'सीईओं'कडे तक्रार; कारवाईची मागणी

म. टा. प्रतिनिधी, नागपूर

एखादे विकासकाम पूर्ण झाल्यानंतरच निरीक्षणाअंती कंत्राटदाराला बिल अदा केले जाते. परंतु, मंजूर झालेल्या रस्त्याचे बांधकामच झाले नाही. कागदावरच रस्त्याचे बांधकाम झाल्याचे दाखवून तब्बल ५ लाख रुपये उचलण्यात आल्याचा प्रकार कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या बिडगाव ग्रा. पं. मध्ये उघडकीस आला आहे. ग्रामस्थांनी या अनागोंदी कारभाराची तक्रार जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करून कारवाईची मागणी केली आहे.

बिडगाव ग्रा. पं. हद्दीतील गंगानगर येथील वॉर्ड क्र १ मधील विलास कळसकर ते दौलत मानेराव ते खरबी-तरोडी रोडपर्यंत १५० मीटर सिमेंट रस्ता बांधकामासाठी स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत ४ सप्टेंबर २०१४ रोजी मंजूर झाला. मात्र, दलित वस्तीत समावेशक असलेल्या या रस्त्याचे बांधकाम न करता रस्ता कागदावर दाखवून बिलाची उचल करीत ५ लाख रुपयांचा निधी गिळंकृत केल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारात उघडकीस आली....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/hd5LmAAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬