[nagpur] - माजी नगरसेविकाच्या मुलावर हल्ला

  |   Nagpurnews

नागपूर : मोटारसायकलचा धक्का लागण्याच्या क्षुल्लक कारणावरून माजी नगरसेविकाच्या मुलावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी राजा लखनसिंग (वय २५, रा. टीव्ही टॉवर, सेमिनरी हिल्स ) याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. आलोक चंदुलाल वडे (वय ४०, रा. कृष्णनगर), असे जखमीचे नाव आहे. राजा याच्याविरुद्ध मारहाण व लुटपाटीचे गुन्हे दाखल आहेत.

१५ ऑगस्टला राजासोबत आलोक यांचा वाद झाला होता. आलोक यांनी राजाला मारहाण केली होती. रविवारी सायंकाळी राजाने आलोक यांना गाठले. त्यांच्याशी वाद घातला. नागरिकांनी वाद सोडविला. आलोक घरी गेले. काही वेळाने राजा त्यांच्या घरी गेला. प्रकरण मिटवायचे असल्याचे सांगून त्यांना घराबाहेर बोलाविले. घरापासून काही अंतरावर दगडाने त्यांच्या डोक्यावर वार करून राजा पसार झाला. नातेवाइकांनी आलोक यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पोलिस राजाचा शोध घेत आहेत.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/HeA6ngAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬