[nagpur] - मानांकित खेळाडूंचे सहज विजय

  |   Nagpurnews

म. टा. क्रीडा प्रतिनिधी, नागपूर

नागपूर जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या यजमानपदाखाली सोमवारपासून सुरू झालेल्या राज्यस्तरीय सबज्युनिअर निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मानांकित खेळाडूंनी पहिल्या फेरीतील लढतींमध्ये सहज विजय मिळवत स्पर्धेत आगेकूच केली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा सुभेदार हॉल व वायएमसीएच्या सभागृहात स्पर्धेतील लढतींना सुरुवात झाली. १५ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत अव्वल मानांकित पुण्याच्या दर्शन पुजारीने पहिल्या फेरीत उस्मानाबादच्या शैलेश मारेला २१-९, २१-९ पराभूत करत स्पर्धेत आगेकूच केली. तर १३ वर्षांखालील मुलींच्या गटात मुंबई उपनगरच्या आलिशा नाईकने एका सोप्या लढतीत अपूर्वा कांबळे हिचा २१-४, २१-१ असा सहज पराभव केला.

१५ वर्षांखालील मुलींच्या गटात सांगलीच्या तेजस शिंदेने ठाण्याच्या शौनक गडकरीला पराभूत केले. दुसरीकडे १३ वर्षांखालील मुलींच्या गटात ठाण्याच्या तनिका सेक्युरिया हिने नागपूरच्या राधिका पारखीचा २१-५, २१-१६ असा पराभव केला. १५ वर्षांखालील मुलींच्या एकेरीत रुचा सावंतने ठाण्याच्या वैष्णवी घागचा २१-९, २१-३ असा पराभव केला. तर १३ वर्षांखालील मुलींच्या गटात सानिका पाटणकरने दोन गेममध्ये अवंतिका खाडीकरचा २१-२, २१-१ असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश निश्चित केला....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/kvD5YAAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬