[nagpur] - महापौरांना मनसेचा घेराव

  |   Nagpurnews

विविध नागरी प्रश्नांवरून संताप

म. टा. प्रतिनिधी, नागपूर

शहरातील विविध समस्यांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापौर नंदा जिचकार यांना सोमवारी घेराव केला. प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या नेतृत्वाखाली व शहर अध्यक्ष अजय ढोके आणि विशाल बडगे यांच्या उपस्थितीत मनसैनिकांनी महापालिकेवर हल्लाबोल करून सत्तारुढ भाजपला घेरले.

स्मार्ट शहराचा नुसता गाजावाजा करण्यात येत आहे. प्रत्यक्षात कोणत्याही समस्यांवर प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत नाही. नागपूरकरांना दिलासा देणार की, समस्या वाढवत राहणार, असा सवाल गडकरी यांनी महापौरांना केला.

शहरात डेंग्यूसारख्या घातक रोगाची साथ असतानाही आरोग्य विभाग निद्रावस्थेत आहे. स्मार्ट शहरातील रस्त्यावर मोकाट जनावरांचा सुळसुळाट असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले. रस्त्यांची दुरवस्था आहे. शाळा आणि शिक्षणाकडे लक्ष देण्यास महापालिकेला वेळ नाही. सुलभ शौचालयाची कमतरता असल्याने प्रमुख बाजारपेठांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी. अनेक वर्षांपासून तलावांचे सौंदर्यीकरण रेंगाळले आहे. झोननिहाय मनुष्यबळाअभावी विकासकामे ठप्प असल्याप्रमाणे स्थिती आहे. पार्किंगची व्यवस्था नसल्याने रस्त्यावर वाहने उभी राहतात, याकडे हेमंत गडकरी व अजय ढोके यांनी महापौरांचे लक्ष वेधले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/46iNuQAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬