[nagpur] - रुग्णांचे मृत्यू सोडेना मनोरुग्णालयाची पाठ

  |   Nagpurnews

अवघ्या आठ महिन्यात आकडा २२ वर

म. टा. प्रतिनिधी, नागपूर

उपचाराला येणाऱ्या रुग्णांच्या मृत्युसत्राचे शुक्लकाष्ठ प्रादेशिक मनोरुग्णालयाची पाठ सोडायला तयार नसून, सोमवारी यात आणखी एकाची भर पडली. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांत मृत्यूचा आकडा आता २२वर पोहोचला आहे. मेडिकलमध्ये पुन्हा एक तरुण उपचारादरम्यान दगावला. आशिष राऊत (२५ ) असे त्याचे नाव आहे.

मानसिक व्याधीग्रस्तांसाठी प्रादेशिक मनोरुग्णालय एकमेव आधार आहे. येथे कधीकाळी फिजिशियन नव्हते. यामुळे येथील प्रत्येक मनोरुग्णाला मेडिकलमध्ये तपासणीसाठी पाठवले जात होते. मात्र, अलीकडे येथे फिजिशियनची नियुक्ती करण्यात आली. यानंतरही रेफरचे धोरण कायम आहे. मनोरुग्णालयात मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्याने मनोरुग्णांचे नातेवाईक संताप व्यक्त करीत आहेत. चालू वर्षात मनोरुग्णालयात अल्प मनुष्यबळ आहे. यामुळे कामाचा तणावही मनोरुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरत आहे. यापूर्वी कला सोनकुसळे आणि शोभा राऊत या दोन महिला उपचारादरम्यान दगावल्या होत्या. गेल्या महिन्यात एक अनोळखी महिला तर एक अनोळखी पुरुष उपचारासाठी मेयो आणि मेडिकलमध्ये भरती होते. त्यांचाही मृत्यू झाला....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/z0QNqAAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬