[nashik] - ‘अकरावीच्या जागा वाढवा’

  |   Nashiknews

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अकरावी प्रवेशात दहा टक्के जागा वाढवून मिळाव्यात, याबाबतच्या कार्यवाहीसाठी सर्व कॉलेजांना सूचित करावे, ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून काही विद्यार्थ्यांना अजूनही प्रवेश मिळालेले नाहीत. ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात असल्यापासून विद्यार्थ्यांचा प्रवेशासाठी खोळंबा होत असल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

पक्षाच्या वतीने शिक्षण उपसंचालक यांना अकरावी प्रवेश प्रक्रियेत सुधारणा करण्याचे निवेदन देण्यात आले. अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली जात असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित रहावे लागते. यंदाही तशीच परिस्थिती उद्भवली आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल, असे झालेले नाही. त्यामुळे या प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ समोर येऊ लागल्याचा आरोप पक्षाने केला आहे.

प्रवेश प्रक्रियेतून सध्या काही कॉलेजांचे प्रवेश विद्यार्थी क्षमतेनुसार पूर्ण झाले आहेत. या कॉलेजांमध्ये अकरावीच्या अध्यापनाचे कार्य सुरू झाले आहे. त्यामुळे वंचित विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाबाबतचा संभ्रम अधिक वाढला आहे. या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेशाच्या १० टक्के जागा वाढवून द्याव्यात. तसेच सर्व वंचित विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. याकडे आपण वैयक्तिक लक्ष द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिक्षण उपसंचालक यांच्याकडे करण्यात आली. मनविसे राज्य उपाध्यक्ष संदीप भवर, शहराध्यक्ष सौरभ सोनवणे, संदीप पैठणपगार आदी उपस्थित होते....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/IoAeEwAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬