[nashik] - अजंग एमआयडीसीचे काम युद्धपातळीवर

  |   Nashiknews

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील अजंग रावळगाव येथे नव्याने उभ्या राहत असलेल्या एमआयडीसीसंदर्भात ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे व उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सतीश गवई यांच्यात मुंबई येथे सोमवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. येत्या दोन महिन्यात अजंग रावळगाव एमआयडीसी संदर्भात कामे युद्ध पातळीवर सुरू करण्यात येणार असल्याची भुसे यांनी दिली.

बैठकीस एमआयडीसीचे अधिकारी अभिषेक कृष्णा, क्षेत्रिय अधिकारी शुभांगी पाटील, उपसचिव भोसले आदी उपस्थित होते. मालेगावात एमआयडीसीचे उपकार्यालय सुरू करावे, प्रस्तावित एमआयडीसीत ६० टक्के टेक्सस्टाईल व ४० टक्के कृषी पूरक व इतर उद्योगांचे नियोजन करावे, मालेगाव एमआयडीसीचा समावेश इंटिग्रेटेड टेक्सस्टाईल हब योजनेत समावेश करून विविध सुविधा द्याव्यात, स्थानिक उद्योजकांना प्राधान्य द्यावे, निर्धारित वेळेआधी उद्योग उभारणाऱ्या उद्योजकांना १० टक्के सवलत द्यावी, एक खिडकी योजना राबवावी आदी सूचना यावेळी करण्यात आल्या....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/Jmwt-AAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬