[nashik] - अहिरराव यांची बदली रद्द करा

  |   Nashiknews

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक तालुका तहसीलदार राजश्री अहिरराव यांची बदली अन्यायकारक असून ती हेतूपुरस्सर केल्याचा दावा विविध संघटनांकडून केला जाऊ लागला आहे. ही बदली तात्काळ रद्द करावी, अशा मागणीच्या निवेदनांचा ओघ वाढू लागला आहे. काही संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांची सोमवारी भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदने दिली.

बदली हा प्रशासकीय कामाचा अविभाज्य भाग आहे. अलीकडेच काही तहसिलदारांच्या बदल्यांचे आदेश सरकारने काढले असून त्यामध्ये नाशिकच्या तहसीलदार डॉ. राजश्री अहिरराव यांचीही संजय गांधी योजनेच्या तहसीलदारपदी बदली करण्यात आली आहे. ही बदली करताना सेवाहक्क आणि तत्सम मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाल्याचा दावा काही संघटनांनी केला असून ही बदली अन्यायकारक असल्याचेही निवेदनामध्ये म्हटले आहे.

अहिरराव यांच्या बदलीमुळे तालुक्यातील सामान्य नागरिकांमध्ये असंतोष असल्याची भावनाही व्यक्त करण्यात आली आहे. अहिरराव यांनी गरजू, सामान्य नागरिकांना कायद्याच्या चौकटीत राहून शक्य ती प्रशासकीय मदत केली. रेशनकार्ड वितरणासारख्या छोट्या पण अत्यावश्यक बाबींसाठी प्रशासकीय पातळीवर अडवणूक होत असताना त्यांनी गरजूंना असे कार्ड मिळवून दिले. त्यामुळे कार्यक्षम तहसीलदार म्हणून अहिरराव लोकप्रिय झाल्या. परंतु राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्यांना धडकी भरल्याने त्यांनी प्रशासनावर दबाव आणून तहसीलदारांची बदली केल्याचा संदेश जनमनावर भिनल्याचेही निवेदनात म्हटले आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/uV4ryAAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬