[nashik] - ठार मारण्याचा प्रयत्न; पाच वर्षांची सक्तमजुरी

  |   Nashiknews

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीसह घरी आलेल्या मित्रावर गोळीबार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी दीपक उर्फ सोनू अशोक परदेशी (रा़ साईराम रो हाउस, म्हाडा कॉलनी, पाथर्डी शिवार) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. सी. खटी यांनी सोमवारी (दि. २७) पाच वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची सुनावली.

आरोपी दीपक परदेशी यास पत्नी कोमलच्या चारित्र्यावर संशय होता. दीपकचा १९ ऑगस्ट २०१६ रोजी वाढदिवस असल्याने त्याचा मित्र नागेश्वर बंगाली ठाकूर (रा. शांतीनगर, मांडसांगवी) हा मित्रांसह केक घेऊन रात्रीच्या वेळी पार्टी करण्यासाठी परदेशीच्या घरी गेला होता. केक कापल्यानंतर सर्व मित्र दारू प्याले आणि निघून गेले. मात्र, ठाकूर हा परदेशीच्या घरी थांबलेला होता़ चरित्र्यावर संशय घेत दीपकने रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पत्नीशी भांडण सुरू झाले. भांडण विकोपाला गेल्यानंतर परदेशीने बॅगमधून गावठी कट्टा काढून पत्नीवर एक तर ठाकूरवर दोन गोळ्या झाडल्या. कोमलच्या डोक्यात गोळी घुसल्याने ती गंभीर जखमी झाली तर ठाकूरच्या गळ्यास व गालास गोळ्या चाटून गेल्या. गोळीबारामुळे घाबरलेल्या ठाकूरने आरडाओरड केली. परिसरातील नागरिकांनी परदेशीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये परदेशीविरुद्ध ठार मारण्याबाबतचा गुन्हा दाखल झाला. कोर्टात सरकारी वकील कल्पक निबांळकर यांनी आठ साक्षीदार तपासले. परदेशीची पत्नी कोमल हिने सरकार पक्षाला सहकार्य केले नाही. मात्र, डोक्यास झालेली जखम व हॉस्पिटलमध्ये झालेले उपचाराबाबत तिला आपले म्हणणे मांडता आले नाही. सबळ पुराव्यांमुळे कोर्टाने परदेशी यास दोषी ठरवत पाच वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/hUV8YwAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬