[nashik] - दत्तु भोकनळ टॉकटाईम

  |   Nashiknews

शब्दांकन : फणिंद्र मंडलिक

नाहीतर, दोन सुवर्णपदकाचा मानकरी झालो असतो

…भारताच्या रोव्हर्सनी आशियाई क्रीडा स्पर्धेत रोइंगमध्ये एक सुवर्ण आणि दोन ब्राँझपदके मिळवून चमकदार कामगिरी केली. यात दत्तू भोकनळ, स्वर्णसिंग, ओम प्रकाश आणि सुखमीत सिंग यांनी क्वाड्राप्ले स्कल्स सांघिकमध्ये सुवर्णयश मिळवले. यातील दत्तू भोकनळ हा नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्याच्या तळेगाव रोहीचा रहिवासी आहे. दत्तूच्या या यशाबद्दल त्याच्याशी केलेली बातचीत...

व‌ैयक्तिक आणि सांघिक स्कल्सबाबत अनुभव कसा होता

या स्पर्धेत मी दोन इव्हेंटमध्ये भाग घेणार होतो. पहिला इव्हेंट हा सिंगल स्कल (वैयक्तीक) व दुसरा क्वाड्राप्ले स्कल्स (सांघिक) होता. या ठिकाणी गेल्यावर वातावरणातील बदलाने माझी तब्येत बिघडली. थंडी, ताप, खोकला सुरू झाला. डोके दुखू लागल्याने वैयक्तिक खेळातून माघार घ्यावी लागली. मात्र क्वाड्राप्ले स्कल्सच्या अंतिम फेरीत आमच्या संघाने ६ मिनिटे १७.१३ सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक मिळवले. आमच्या संघाने इंडोनेशिया आणि थायलंडच्या संघाला मागे टाकले. इंडोनेशियाने ६ मिनिटे २०.५८ सेकंद वेळ नोंदवून रौप्यपदक, तर थायलंडच्या संघाने ६ मिनिटे २२.४१ सेकंद वेळ नोंदवून ब्राँझपदक मिळवले. माझी तब्येत बिघडली नसती तर मी आज दोन सुवर्णपदकांचा मानकरी होऊ शकलो असतो....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/r3SyQQAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬