[nashik] - सिडको-प्रभाग सभा
(फोटो आहे)
सत्ताधाऱ्यांवरच भांडण्याची वेळ!
नाशिकरोड प्रभागसमिती सभेतील प्रकार
म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
नाशिकरोड प्रभाग समितीची सभा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करून सोमवारी (ता. २७)तहकूब करण्यात आली. त्यानंतर सभापती पंडित आवारे यांच्या दालनात झालेल्या पालिका अधिकारी व नगरसेवकांच्या बैठकीत उपस्थित नगरसेवकांनी पालिका अधिकाऱ्यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर आगपाखड केली.
नाशिकरोड विभागीय कार्यालयात झालेली ही सभा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करून तहकूब करण्यात आली. प्रभाग सभापती पंडित आवारे, नगरसेवक बाजीराव भागवत, केशव पोरजे, सत्यभामा गाडेकर, ज्योती खोले, मिरा हांडगे, जयश्री खर्जुल, विशाल संगमनेरे, सुनिता कोठुळे, अंबादास पगारे, सीमा ताजणे, मंगला आढाव आदी उपस्थित होते. त्यानंतर प्रभाग सभापतींच्या दालनात झालेली बैठक नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपाने गाजली. पालिकेच्या विद्युत, बांधकाम, पाणी या विभागाच्या अधिकाऱ्यांवर उपस्थित नगरसेवकांनी प्रश्नांची सरबत्ती केली. खड्ड्यांच्या प्रश्नावरही नगरसेवकांनी उपस्थित अधिकाऱ्यांवर तोंडसुख घेतले. गेल्या वेळच्या प्रभाग सभेत गाजलेल्या विषयांकडे संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे उघड झाल्याने नगरसेवकांचा तिळपापड झाला....
येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/5p6QXAAA