[nashik] - स्वाईन फ्लूचे सात बळी

  |   Nashiknews

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्वाईन फ्लूचा उपचार घेताना आतापर्यंत सात जणांचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. या आजाराची २१ जणांना लागण झाली असून, सध्याचे वातावरण स्वाईन फ्लू पसरविण्यास हातभार लावतो आहे.

मागील वर्षापासून थंड झालेल्या स्वाईन फ्लूने यंदा पुन्हा हातपाय पसरविण्यास सुरुवात केली आहे. या वर्षी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्यांपैकी २१ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर सात जणांचा मृत्यू झाला. यात, अहमदनगर, चांदवड, जेलरोड, गुरु गोविंदसिंग कॉलेज येथील प्रत्येकी एक तर निफाडच्या करंजगाव आणि ओझर येथील दोघांचा समावेश आहे. वावी येथील राजेंद्र पवार या ४५ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू हा स्वाईन फ्लूचा सातवा बळी ठरला.

शहरासह जिल्ह्यात जवळपास १० ते १२ दिवसांपासून पावसाचा मुक्काम कायम असून, हवेत गारवा निर्माण झाला आहे. या हवामानाचा थेट परिणाम स्वाईन फ्लूच्या फैलावावर होतो. त्यामुळे नागरिकांनी साधा फ्लू असला तरी लागलीच उपचार करणे आवश्यक आहे. सतत हात धुणे, गर्दीत जाणे टाळणे महत्त्वाचे असते. लहान मुले आणि गर्भवती महिलांनी गर्दीत जाणे टाळणे महत्त्वाचे असते. स्वाइन फ्लू हा संसर्गजन्य रोग आहे. या व्हायरसला एच १ व एन १ या नावाने ओळखले जाते. पावसाळ्याच्या वातावरणात स्वाइन फ्लूचे विषाणू अधिक तीव्रतेने संसर्ग करतात. स्वाइन फ्लू झालेल्या पेशंटद्वारे इतरांना याचा संसर्ग होऊ शकतो. या रोगाचे जंतू हवेतून मानवी शरीरात श्वासावाटे प्रवेश करू शकतात. संबंधित रुग्णाचा खोकला, शिंक यातूनही या पेशंटच्या संपर्कातील व्यक्तीला लागण होऊ शकते....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/YfaPCQAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬