[navi-mumbai] - एक्स्प्रेसमध्ये महिलेसलुटणाऱ्यास अटक
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतील लोकलप्रमाणेच लांब पल्ल्याच्या मार्गावर एकट्यादुकट्या महिला प्रवाशांना लुटण्याच्या प्रकाराची पुनरावृत्ती नुकतीच सीएसएमटीमध्ये घडली. गेल्या गुरुवारी चोरट्याकडून पर्स लुटण्याचा प्रयत्न सुरू असतानाच तोल गेल्याने प्रतिभा त्रिपाठी (५८) या रुळांवर पडल्याचा गुन्हा गेल्या गुरुवारी नोंदवण्यात आला. या गंभीर गुन्ह्याची दखल घेत रेल्वे पोलिसांनी तातडीने संशयित आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक केली आहे.
सीएसएमटी येथून गेल्या गुरुवारी बेंगळुरु येथे बहिणीकडे जाण्यासाठी म्हणून त्रिपाठी यांनी उद्यान एक्स्प्रेसचे तिकीट आरक्षित केले. २२ ऑगस्ट रोजी सकाळी ८.१०च्या सुमारास सीएसएमटीहून काही अंतरावर ही एक्स्प्रेस पोहोचताच मुकद्दर इद्रसी उर्फ रेहमा (२४) या चोरट्याने त्यांच्याकडील पर्स चोरण्याचा प्रयत्न केला. त्रिपाठी यांनी त्यास विरोध केला. त्यात त्यांचा तोल गेल्याने रुळांवर पडल्या. त्यांच्या डोक्यास मार लागला आणि उजव्या हातास फ्रॅक्चर झाले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत रेल्वे पोलिसांनी तपास सुरू केला....
येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/7GPICwAA