[navi-mumbai] - एनएमएमटीच्या ३० नवीन बस

  |   Navi-Mumbainews

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

एनएमएमटीच्या ताफ्यात डिझेलवर चालणाऱ्या ३० नवीन बस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे आता एनएमएमटीची बससंख्या ४९०वर पोहचली आहे. तुर्भे आगारात या बस उभ्या असून उपप्रादेशिक परिवहनकडे त्यांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली की, या बस प्रवासी सुविधेसाठी रस्त्यावर उतरवल्या जातील. त्यामुळे बसफेऱ्या वाढतील, शिवाय आणखी काही नवीन मार्ग सुरू करण्याचा विचार एनएमएमटी प्रशासन करत आहे.

नवी मुंबई शहराचा विकास वेगाने होत आहे. अनेक नवीन गृहप्रकल्प, आयटी क्षेत्र वाढत आहे. परिणामी शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे शहरात वाहतुकीची सुविधा वाढण्याची गरज आहे. शहरात सर्वाजानिक वाहतुकीसाठी एनएमएमटी बससेवा, रिक्षा वाहतूक सेवा या पर्यायांसोबत बेस्टची सुविधा सुरू आहे. मात्र शहरातील अंतर्गत वाहतुकीसाठी नागरिकांचा अधिक कल एनएमएमटी बसेकडे अधिक आहे. परंतु प्रवाशाच्या मागणी पाहता, ही बससेवा अपुरी पडत असल्याने प्रवासी नाइलाजाने तिकीट दर अधिक असूनही बेस्टने प्रवास करतात. त्यामुळे एनएमएमटीने आपल्या बसफेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी प्रवासी करत असतात. प्रवाशांची ही मागणी आणि शहराची सार्वजनिक वाहतुकीची गरज लक्षात घेऊन एनएमएमटी प्रशासनाने ३० डिझेलवर चालणाऱ्या बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. परिवहन सभेच्या मंजुरीनंतर या बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत. या एका बसची किंमत २८ लाख रुपये आहे. सध्या या बसची उपप्रादेशिक परिवहन कडे नोंदणी करण्याचे काम सुरू आहे. दररोज पाच बसची नोंदणी केली जात आहे, अशी माहिती यांत्रिकी विभागाचे अभियंता विवेक आचलकर यांनी दिली.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/Ffl6egAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬