[navi-mumbai] - तापाने मुंबई फणफणली

  |   Navi-Mumbainews

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

पाऊससरींच्या येण्या-जाण्याने मुंबईतील ताप, डोकेदुखी, अंगदुखी, खोकल्याच्या रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढली आहे. हा ताप संसर्गजन्य म्हणजे व्हायरल प्रकारचा असून, त्यासाठी पाच ते सात दिवस औषधोपचार घेण्याची गरज मुंबईकरांना भासत आहे. पावसाळ्यातील तापाच्या उपचारांसाठी पालिकेने सुरू केलेल्या ओपीडीमध्येही रुग्णसंख्या वाढल्याचे दिसते.

खासगी व सार्वजनिक रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांमध्ये तापाच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर काही जणांना व्हायरल प्रकारचा ताप येतो. तो गेल्यानंतर दिलेला औषधांचा कोर्स पूर्ण केला जात नाही. प्रतिजैविके वेळेवर व पूर्णपणे न घेतल्यामुळे ताप पुन्हा येण्याचे प्रमाण अधिक असलेल्या रुग्णांची नोंद होत आहे. 'हा ताप मुदतीचा असल्याने दोन दिवसांनी तपासण्या करण्याचा सल्ला दिला जातो', असे जनरल फिजिशिअन डॉ. जतीन मोरे सांगतात. 'कुटुंबातील एका रुग्णाचा ताप बरा झाला की दुसऱ्या व्यक्तीला त्याची लागण होते. त्यामुळे संसर्ग वाढत जातो. प्रत्येक वर्षी पावसाचा पॅटर्न वेगवेगळा असतो', असे बालरोगतज्ज्ञ डॉ. शाल्मली सावंत सांगतात. 'लहान मुलांमध्ये यंदाही सर्दी, खोकला, ताप येण्याचे प्रमाण वाढते आहे. संसर्गजन्य तापाच्या साथीमध्ये सर्वाधिक त्रास लहान मुले, ज्येष्ठ नागरिक या रोगप्रतिकारशक्ती तुलनेने कमी असलेल्या वर्गाला होतो. प्रतिजैविकांचा वापर लहान मुलांच्या औषधोपचार पद्धतीत त्वरित सुरू केला जात नाही. त्यामुळे गुण येण्यास वेळ लागला तरीही कोर्स व्यवस्थित पूर्ण केला तर ताप पुन्हापुन्हा येण्याची शक्यता कमी होते', याकडे त्या लक्ष वेधतात....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/KwQqbgAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬