[navi-mumbai] - 'त्या' १३ जणींचा लढा

  |   Navi-Mumbainews

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

अनिष्ट रुढी परंपरांचे ओझे वाहणाऱ्या वैदू समाजाने जातपंचायतीला झुगारून देत वैदू विकास समितीची स्थापना केली. या समितीच्या माध्यमातून गावकुसाबाहेर ठेवण्यात आलेल्या महिलांना त्यांच्या हक्क व अधिकाराविषयी माहिती देण्यात आली. मुंबईसारख्या शहरातील बालविवाहाच्या अनिष्ट जोखडात अडकलेल्या १३ मुलींनी पुढाकार घेऊन हे विवाह मान्य नाहीत, असे निधडेपणाने सांगितले आहे. हक्क व अधिकारांविषयी आत्मभान आलेल्या या मुलींना समुपदेशन, कायदेशीर मदत देण्यासाठी स्वाधार या संस्थेने पुढाकार घेतला आहे.

वैदू समाजात जातपंचायतीच्या माध्यमातून मुलींच्या लग्नाचा निर्णय घेतला जात होता. पाळण्यात, लहान वयामध्ये मुलींची लग्ने लावून दिली जात होती. अशाप्रकारे बालविवाह करणे गुन्हा असल्याची पुसटशी जाणीवही वैदू समाजात नव्हती. पंचांच्या मक्तेदारीपुढे या मुलींचे म्हणणे ऐकून घेतले जात नव्हते. जातपंचायतीच्या माध्यमातून अशा अनेक प्रकरणांमध्ये मुलींचे हक्क व अधिकार डावलणारे निर्णय सातत्याने देण्यात आले. वैदू विकास समितीच्या दुर्गा गुडिलू यांनी कायद्याचा धाक आणि लोकशिक्षणाच्या मदतीने पंचाची ही दहशत मोडून काढली. मुलींमध्ये शिक्षणाचे महत्त्व रुजवले. या परिवर्तनामुळे आता नकळत्या वयात, संमती नसताना बालविवाहामध्ये लोटल्या गेलेल्या मुलींनी हे विवाह मान्य नाहीत, असे धीटपणे येऊन सांगितले आहे. लहानपणी विवाह झालेल्या काही मुली आता कळत्या वयात आहेत, तर काही जणींना हा विवाह मान्य नाही. जबरदस्तीने हे विवाह लावून देण्यात आल्याची तक्रारही या मुलींनी केली आहे. व्यसनाच्या आहारी गेलेल्या, वयाने अधिक असलेल्या, वैचारिक मतभेद असलेल्या जोडीदारासोबत नांदण्यास या मुलींनी नकार दिला आहे. वैदू विकास समितीच्या माध्यमातून या मुलींना न्याय मिळवून देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/zoXwgAAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬