[navi-mumbai] - नृत्य, नोटाउधळणीपायी नोकरीवर गदा
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
दसऱ्यानिमित्त बेस्टच्या वडाळा आगारातील सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य करणाऱ्या अभिनेत्री माधवी जुवेकर यांच्यासह बेस्टमधील सात कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला. तसेच, अन्य चार कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी कमी करण्यात आली आहे.
बेस्ट उपक्रमाच्या वडाळा आगारात गेल्या वर्षी दसऱ्यानिमित्त सत्यनारायण पूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बेस्टमधील कर्मचारी आणि अभिनेत्री जुवेकर यांनी अन्य महिला सहकाऱ्यांसह नृत्य सादर केले. त्यावेळी बेस्टचे अधिकारी जुवेकर यांच्यावर पैशांची उधळण करीत असल्याचे दाखवणारा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावरून टीकेची राळ उडवली गेली. बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्रकुमार बागडे यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले होते. त्या चौकशीचा अहवाल गुरुवारी महाव्यवस्थापकांना सादर करण्यात आला. त्यात जुवेकर यांच्यासह ११ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर दोषारोप ठेवण्यात आला....
येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/NfvE-QAA