[navi-mumbai] - रुग्णसेवेची मोहीम फत्ते
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
वैद्यकीय रुग्णसेवा करताना प्रत्येक डॉक्टरांना प्रत्येक टप्प्यांवर काही ना काही शिकायला मिळतेच. भेटणारे रुग्ण, त्यांचे आजार, अटीतटीच्या वेळी रुग्णांना मिळालेली मदत, त्यांच्याकडे पाठ फिरवून निघून गेलेल्यांची आत्मकेंद्री वृत्तीही...हे आणि असे अनेक अनुभव केरळच्याही मदतकार्यामध्ये मिळाल्याची भावना जे. जे. आणि ससून रुग्णालयातून केरळला गेलेल्या सर्व डॉक्टरांच्या मनात होती.
वैद्यकीय मदतीसाठी गेलेले महाराष्ट्रातील डॉक्टरांचे हे पथक सोमवारी सात दिवसांनंतर मुंबईत परतले. हा अनुभ खूप काही शिकवणारा होता, घडवणारा होता. आपत्कालीन परिस्थितीमध्ये यंत्रणा जबाबदारीने काम करीत होती. माणसं न थकता अविश्रांत एकमेकांना सांभाळून घेत होती. भाषेचा अडसर होता. पण तो डॉक्टर आणि रुग्णांमध्ये येऊ शकला नाही. या कठीण प्रसंगामध्ये उपचारासाठी येणाऱ्या या रुग्णांनी दाखवलेले धाडस, परिस्थितीवर मात करण्यासाठी एकवटलेली हिंमत महत्त्वाची होती. त्यामुळे ते परिस्थितीप्रमाणे आजारांवरही मात करू शकतील, असा विश्वास जेजे रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या टीमने केरळहून परत आल्यावर व्यक्त केला. टवेगवेगळ्या नैसर्गिक आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये डॉक्टर आरोग्यसेवा द्यायला जातात. जिथे जाणार आहोत तिथली दृश्ये प्रसारमाध्यमांमधून पाहिलेली असतात. प्रत्यक्षात तिथे गेल्यानंतर अनेक गोष्टी समोर येतात. अडथळे असतात, आव्हाने असतात. पुस्तकांमध्ये शिकलेली प्रत्येक गोष्ट सोबत असते. पण आता जगाच्या शाळेत मिळालेले अनुभव शिक्षणही महत्त्वाचे असते, त्याचा पुरेपूर वापर करावा लागतो', असे निवासी डॉक्टर सारंग दोनारकर सांगतात....
येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/pwjNKQAA