[navi-mumbai] - सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न

  |   Navi-Mumbainews

समन्वय बैठकीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनादरम्यान कोपरखैरणे येथे घडलेल्या हिंसक घटनेमुळे दोन समाजामध्ये निर्माण झालेल्या तणावातून सामाजिक उत्सव व धार्मिक सणांमध्ये शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी नवी मुंबई पोलिस आयुक्तालयावतीने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी सोमवारी वाशी येथे विष्णुदास भावे नाट्यगृहात समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत नागरिक, तरुण, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी उपस्थित राहून यापुढे नवी मुंबई शहराच्या कायदा-सुव्यवस्थेला कोणतेही गालबोट लागणार नाही, अशी भावना व्यक्त केली.

पोलिसांनी आयोजित केलेल्या समन्वय बैठकीत नवी मुंबईच्या उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, नगरसेविका शुभांगी पाटील, नगरसेवक रामचंद्र घरत, किशोर पाटकर, राजू शिंदे, विठ्ठल मोरे यांच्यासह नागरिक, तरुण, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते. यावेळी तरुण व नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी पुण्याच्या यशदा संस्थेचे गणेश शिंदे यांनी समाजव्यवस्थेच्या तरुण पिढीकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या अपेक्षांचे ओझे पेलण्याची ताकद ही आपल्या मनगटात आहे का ती कुठे व केव्हा व्यक्त करायची, यासाठी विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे सांगितले. आपल्या हक्कासाठी आंदोलन करणे ही बाब समजू शकतो. परंतु सध्या निर्माण झालेली परिस्थिती व वाद हा गरीब व श्रीमंत असा वर्गवारी भेद आहे. एखाद्या समाजातील, धर्मातील व राजकीय पक्षांमधील वाद मिटवून त्यावर एकमत होऊ शकते. परंतु सध्या निर्माण होणारा गरीब व श्रीमंत वर्गवारी भेद वाद मिटवणे शक्य होणार नाही, असेही ते म्हणाले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/P8mJTgAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬