[pune] - आरक्षणाच्या बदल्यात ‘मर्सिडीझ’
वसंत मोरे यांचा आमदार योगेश टिळेकरांवर आरोप
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'येवलेवाडी येथील आरक्षण उठविण्याच्या बदल्यात हडपसरचे आमदार योगेश टिळेकर यांना बांधकाम व्यावसायिकाने मर्सिडीझ गाडी भेट दिली असून, या व्यावसायिकाच्या कंपनीमधून गाडीचा हप्ता भरला जात आहे,' असा खळबळजनक आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते वसंत मोरे यांनी केला.
गेल्या वर्षी सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर येवलेवाडीचा विकास आराखडा (डीपी) मंजूर केला. डीपी मान्य केल्यानंतर अवघ्या चोवीस दिवसांमध्ये संबंधित बांधकाम व्यावसायिकाने १ कोटी ४ लाख रुपयांची मर्सिडीझ गाडी खरेदी करून आमदार टिळेकर यांना दिली. या मोटारीचा क्रमांक एमएच १२ पीआर ००७८ असा आहे. ही मोटार शोरूममधून घेताना आमदार टिळेकर यांचे बंधू उपस्थित होते. तेव्हापासून ही मोटार टिळेकर यांच्याकडेच आहे. टिळेकर कुटुंबीयांकडे असलेल्या विविध मोटारींचे क्रमांक ००७८ असेच आहेत. मर्सिडीझ मोटारीसाठी व्यावसायिकाने ७४ लाख रुपयांचे कर्जही घेतले आहे. त्याचा दीड लाख रुपयांचा मासिक हप्ता त्याच्या कंपनीच्या खात्यातून भरला जात असल्याचे पुरावेही मोरे यांनी सादर केले....
येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/sFSICgAA