[pune] - ‘उजनी’ही ओव्हरफ्लो

  |   Punenews

इंदापूर : पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यासह मराठवाड्यालाही वरदान ठरलेले उजनी धरण सोमवारी (२७ ऑगस्ट) दुपारी १०० टक्के भरले. धरणाच्या एकूण ४२ मोऱ्यांपैकी सोळा मोऱ्यांमधून भीमा नदीत दहा हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.

सध्या उजनीत ११७ टीएमसी पाणीसाठा आहे. धरणाची एकूण क्षमता १२३ टीएमसी इतकी असून, मृत पाणीसाठा ५३.५७ टीएमसी आहे. उजनीने ३८ वर्षांत ३० वेळा शंभरी गाठली आहे. सध्या बंडगार्डन बंधाऱ्यातून ३१ हजार ७७० क्युसेक व दौंडमधून ४० हजार २२६ क्युसेकने 'उजनी'त पाणी येत आहे. सायंकाळी एकूण ४२ मोऱ्यांपैकी सोळा मोऱ्यांतून दहा हजार क्युसेकने भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू होता. दरम्यान, उजनी भरल्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच, कारखानदार व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 'नीरा आणि भीमेच्या पाण्यात वाढ होत असल्याने नदीकाठच्या नागरिकांना जलसंपदा विभागाच्या वतीने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे,' असे उजनी धरणाचे शाखा अभियंता बाळकृष्ण क्षीरसागर यांनी सांगितले.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/MgMueAAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬