[pune] - नक्षलवादी समर्थक असल्याच्या संशयातून छापे

  |   Punenews

पुणे:

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळेंसह चौघांना अटक केल्यानंतर आज पुन्हा काही घरांवर पोलिसांनी छापे टाकले. नक्षलवाद्यांचे समर्थक असल्याच्या संशयातून मुंबई, हैदराबाद, छत्तीसगड येथे काही लोकांच्या घराची पोलिसांनी झडती घेतली.

हैदराबादमध्ये वरवरा राव, मुंबईत अरुण परेरा, वर्नोन गोनसाल्वीस, गोव्यात आनंद तेलतुंबडे, छत्तीसगमध्ये सुधा भारद्वाज आणि गौतम नवलाखा यांच्या घराची पोलिसांनी आज झडती घेतली. एल्गार प्रकरणानंतर अटक करण्यात आलेल्या पाचही जणांनी केलेले सुमारे २०० ते २५० ई-मेल तपासण्यात आले. या ई-मेल्सच्या आधारावर पोलिसांनी आजची कारवाई केल्याची चर्चा आहे.

मुंबईतून अटक केलेल्या अरुण परेरा यांना यापूर्वीही कथित नक्षलवादी म्हणून अटक करण्यात आली होती. परंतु, काही दिवसांतच परेरा यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. वर्नोन गोनसाल्वीस याने यापूर्वी ७ वर्षाची शिक्षा भोगली आहे. वरवरा राव हे विचारवंत आणि कवी असून शहरी नक्षलवादाचे 'थिंक टँक' असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गौतम नवलाखा हा कश्मीरमधील फुटिरतावादी आणि नक्षलवाद्यांतील मधील दुवा म्हणून काम करत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. शहरात नक्षलवादी चळवळ पसरविण्यात सुधा भारद्वाज यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/XU8CowAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬