[pune] - ...पण सेवा संपायला नको

  |   Punenews

चरित्र प्रकाशनावेळी बच्चू कडू यांची भावना

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षांनीही प्रश्न सुटलेले नाहीत. आंदोलने करताना अनेकदा हातही उचलावा लागतो. मात्र, हात उचलणाऱ्यांपेक्षा हात देणाराच मोठा होतो', असे स्पष्ट करून 'राजकारण संपले तरी चालेल, पण माझी सेवा संपायला नको', अशी प्रांजळ भावना आमदार बच्चू कडू यांनी सोमवारी व्यक्त केली. 'आपल्या मनातला हिरवा, भगवा, निळा रंग जाऊन तिरंग्याचा विचार येईल, तेव्हा निश्चितच वेगळी क्रांती होईल,' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जनजागृती प्रकाशनातर्फे नीलेश डावखरे आणि उद्धव ढवळे लिखित 'लोकनायक' या बच्चू कडू यांच्या चरित्राचे प्रकाशन हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी बच्चू कडू बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी, स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, नैना कडू, प्रकाशक राहुल वाळके आदी या वेळी उपस्थित होते....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/4U28iAAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬