[pune] - पत्नीची पतीला मारहाण

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुलाला अंघोळ घालण्याच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर, पत्नीने पतीला मारहाण केल्याचा प्रकार हडपसर येथील सय्यदनगर येथे घडला. पत्नीने पतीला चावा घेऊन गंभीर जखमी केले.

या प्रकरणी पतीने (वय २७) वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पत्नीविरोधात (वय २२) मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सय्यदनगर येथे हे दाम्पत्य राहते. बकरी ईदच्या दिवशी नमाज पठणाला जात असताना, पतीने त्यांच्या तीन वर्षीय मुलाला सोबत घेऊन जात असल्याचे पत्नीला सांगितले. त्यावर पत्नीने पतीला मुलास प्रथम अंघोळ घालण्यास सांगितले. मात्र, या मुद्द्यावरून दोघांमध्ये वादावादी झाली. या वादाचे पर्यवसान झटापटीत झाले. त्यात पत्नीने पतीच्या उजव्या आणि डाव्या हाताच्या दंडाला चावा घेऊन गंभीर जखमी केले; तसेच या वेळी पतीला बाथरूममधील नळ आणि कात्री लागूनही जखम झाली. या घटनेनंतर पत्नी माहेरी निघून गेली. पतीने या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात तिच्या विरोधात तक्रार नोंदवली असून, वानवडी पोलिस पुढील तपास करीत आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/l-nx8AAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬