[pune] - पत्नीला जाळून मारण्याचा प्रयत्न

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

माहेरच्या मालमत्तेवरून पत्नीला पतीने जिवे जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना रविवारी मध्यरात्री सोमवार पेठेत घडली. या प्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून पतीला अटक करण्यात आली आहे.

सुरेखा जाधव (वय ५१, रा. नरपतगिरी चौक, सोमवार पेठ) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती प्रदीप जाधव (वय ५१) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहेरच्या मालमत्तेवरून सुरेखा आणि प्रदीप यांच्यात सातत्याने वाद होत होते. याच कारणावरून रविवारी मध्यरात्री पुन्हा वाद झाले. त्या वेळी आरोपीने सुरेखा यांच्या अंगावर रॉकेल ओतून लायटरने आग लावून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी तक्रार आल्यानंतर पतीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सहायक निरीक्षक पी. आर. शिकलगार अधिक तपास करत आहेत.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/GWqL1AAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬