[pune] - पालिकेचे १५ कोटींचे नुकसान?
ट्रक खरेदीबाबत सजग नागरिक मंचाचा आरोप
म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेने यांत्रिकी पद्धतीने रस्त्यांची साफसफाई करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी पाच वर्षे मुदतीच्या ४८ कोटी रुपयांच्या निविदा मंजूर करण्यात आल्या आहेत. या निविदांमध्ये साफसफाईसाठी घेण्यात येणाऱ्या टाटा कंपनीच्या एका 'रोड स्वीपर ट्रक'ची किंमत ७८ लाख रुपये दर्शविण्यात आली आहे. मात्र, केंद्र सरकारच्या वेबसाइटवर याच कंपनीच्या ट्रकची किमंत ५९.२५ लाख रुपये दर्शविली आहे. स्थायी समितीने या निविदा मंजूर केल्यामुळे महापालिकेचे १५ कोटी रुपये नुकसान होत असल्याचा आरोप सजग नागरिक मंचाने केला आहे. त्यामुळे महापालिकेने मंजूर केलेल्या या निविदा तत्काळ रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी 'सजग'ने महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे.
महापालिकेच्या तीन प्रभागांमध्ये यांत्रिक पद्धतीने साफसफाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी तीन निविदा काढण्यात आल्या असून, पाच वर्षांच्या कालावधीत त्यावर ४८ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या साफसफाईसाठी टाटा कंपनीचे एलपीटी १६१३ बीएस-चार हे नऊ 'रोड स्वीपर ट्रक' खरेदी करण्यात येणार आहेत. हे ट्रक कंत्राटदार घेणार असून, त्यासाठी त्याने प्रति ट्रकची किंमत ७८ लाख रुपये दर्शविली आहे. या किमतीवर २८ टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आकारण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या पोर्टलवर या कंपनीच्या याच मॉडेलच्या ट्रकची किंमत ५९.२५ लाख रुपये दर्शविली आहे. त्यावर २८ टक्के 'जीएसटी'ची आकारणी केली, तरी ही किमंत ७८ लाख रुपयांच्या घरात जात नाही. दरम्यान, याच ट्रकची किंमत ही डीलरसाठी ४७ लाख रुपये असल्याचे याच वेबसाइटवर नमूद करण्यात आले आहे; तसेच या ४७ लाख रुपयांमध्ये २८ टक्के 'जीएसटी'ची आकारणी करण्यात आली असल्याचा दावा विवेक वेलणकर आणि विश्वास सहस्रबुद्धे यांनी केला आहे....
येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/wlqvlwAA