[pune] - मॅनहोलचे झाकणहोणार दणकट

  |   Punenews

पुणे : वर्दळीच्या रस्त्यांवरील मॅनहोलची काँक्रिटची झाकणे बदलून त्या जागी 'फायबर रिइन्फोर्स्ड पॉलिमर'ची (एफआरपी) झाकणे बसविण्याचा निर्णय पुणे कँटोन्मेंट बोर्डाने घेतला आहे. मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीच्या अतिरिक्त ताणामुळे मॅनहोलची झाकणे तुटण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, अपघातही होत आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बोर्डाने मुख्य रस्त्यांवरील मॅनहोलची झाकणे बदलून 'एफआरपी' झाकणे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लष्कर परिसरातील वाहतूक अडथळा विरहीत होण्यास मदत मिळणार आहे.

कँटोन्मेंटमधील सोलापूर रस्ता, वानवडी, घोरपडी परिसरातील मुख्य रस्त्यांवरच्या मॅनहोलला 'एफआरपी'चे आवरण बसविले जाणार आहे. कँटोन्मेंटमध्ये ब्रिटिशकाळापासूनच्या सांडपाणी वाहिन्या अस्तित्वात आहेत. काळाच्या ओघात या सांडपाणी वाहिन्यांवर रस्ते तयार झाले आहेत. या सांडपाणी वाहिन्यांच्या मॅनहोलवर काँक्रिटची झाकणे आहेत. वाहनांमुळे त्यांना तडे जातात. परिणामी त्यांची वारंवार दुरुस्ती करावी लागते. त्यामुळे वाहतुकीला अडथळाही निर्माण होतो. त्या पार्श्वभूमीवर मॅनहोलची झाकणे बदलून फायबर रिइन्फोर्स्ड पॉलिमरचे आवरण असलेली झाकणे लावण्याचा निर्णय बोर्डाच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. त्यानुसार, कॅस्टोलिनो रोड, पूलगेट, वानवडी बाजार, घोरपडी बाजार अशा वर्दळीच्या रस्त्यांवर असलेल्या सांडपाणी वाहिन्या, पावसाळी नाल्यांच्या वाहिन्यांच्या मॅनहोलवर एफआरपीचे आवरण असलेली झाकणे लावण्यात येणार आहेत, अशी माहिती बोर्डाच्या अभियांत्रिकी विभागाने दिली.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/xxBk1wAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬