[pune] - विवाहितेची आत्महत्या

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पतीच्या त्रासाला कंटाळून आकुर्डी येथील राहत्या घरात विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. भावाला रविवारी (दि. २६) राखी बांधून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी दुपारी (दि. २७) तिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मूळच्या नेपाळ येथील असलेल्या या विवाहितेने आत्महत्येपूर्वी पतीकडून होणाऱ्या त्रासाचे ऑडिओ रेकॉर्डिंग मोबाइलमध्ये करून ठेवले आहे.

पवित्रा पद्मराज डोंगना (३३, रा. क्रांतीनगर, आकुर्डी, मूळ नेपाळ) असे आत्महत्या केलेल्या विवाहितचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवित्रा गेल्या सहा महिन्यांपासून तिच्या पतीसह आकुर्डी येथे राहत आहे. पवित्राचा पती पद्मराज हा एका सोसायटीमध्ये सुरक्षारक्षक आहे. पद्मराज सकाळी कामानिमित्त बाहेर गेला असताना खोलीचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ दरवाजा ठोठावून प्रतिसाद न मिळाल्याने त्याने शेजारच्यांच्या मदतीने दरवाजा तोडला. या वेळी पवित्राचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/VcvSJwAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬