[pune] - सर्वसाधारण सभावादळी ठरणार

  |   Punenews

येवलेवाडी 'डीपी'चा मुद्दा गाजण्याची शक्यता

म. टा. प्रतिनिधी, पुणे

येवलेवाडी गावाच्या विकास आराखड्यातील (डीपी) डोंगर उताराचे आरक्षण असलेले १५ हेक्टर क्षेत्र निवासी करण्याचा घाट घालण्यात आल्याने आज, मंगळवारी (२८ ऑगस्ट) होणारी सर्वसाधारण सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या नगरसेवकांना 'व्हिप' बजावून मतदानाला उपस्थित राहण्यास बजावले आहे. नियोजन समितीने आपला अहवाल सादर केला असून, तो मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

नियोजन समितीने सादर केलेल्या अहवालामुळे पालिकेत एकच खळबळ उडाली आहे. सुमारे १०० कोटी रुपयांच्या जमिनीवरील आरक्षणात बदल करण्याची शिफारस विकास आराखड्यावरील हरकती सूचनांवर निर्णय घेण्यासाठी नेमलेल्या नियोजन समितीने केली आहे. त्याचबरोबर दफनभूमीचे क्षेत्र निवासी करणे, वॉटर स्पोर्ट‌चे आरक्षण बदलणे, रस्त्याच्या अलाइनमेंट बदलण्यासारखे सहा ते सात आरक्षणाचे बदल केल्याने विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. नियोजन समितीने सादर केलेला अहवाल फेटाळण्याचा निर्णय घेतल्याचे सत्ताधारी भाजपच्या गोटातून सांगण्यात येत आहे. दरम्यान भाजपच्या एका गटाचा नियोजन समितीने सुचविलेले बदल स्वीकारावे असा सूर आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या नगरसेवकांसाठी 'व्हिप' काढला आहे. कुठलीही उपसूचना न देणे, पक्षाविरोधात मतदान न करणे आदी सूचना या 'व्हिप'द्वारे करण्यात आल्या आहेत. महापालिकेत भाजपच्या पक्ष कार्यालयात सत्ताधारी नगरसेवकांची सोमवारी दुपारी बैठक झाली. यावेळी सर्वांना सूचना देण्यात आल्या आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/1aQAZAAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬