[thane] - आरोग्य अधिकाऱ्यांकडून अखेर पाहणी

  |   Thanenews

मटा इम्पॅक्ट

म. टा. खास प्रतिनिधी, कल्याण

डोंबिवली एमआयडीसीत डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून आल्याचे वृत्त सोमवारी 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये प्रसिद्ध होताच पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने या परिसराची संपूर्ण पाहणी केली. डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यातून होते. मात्र तरीदेखील अन्य कोणत्याही आजारांचाही प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी बकाल एमआयडीसी भागाची स्वच्छता हाती घेण्यात आली. तसेच, येथील गणपती तलावातील वरवरचा गाळ काढण्याचे कामदेखील पालिका करणार आहे.

डोंबिवली एमआयडीसी परिसरात गेल्या आठवडाभरात डेंग्यूसदृश आजाराचे पाच ते सहा रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांच्या चाचण्यांनंतर हा आजार डेंग्यूच आहे की नाही, हे निष्पन्न होईल, मात्र या भागातील लोकांच्या आरोग्याची हेळसांड होत असल्याचे वृत्त सोमवारी 'ठाणे प्लस'मध्ये प्रसिद्ध झाले. या वृत्तानंतर एमआयडीसी परिसराचे पालिकेतील प्रभारी मुख्य स्वच्छता निरीक्षक नरेंद्र धोत्रे यांनी हा भाग पिंजून काढला. या भागात जागोजागी रस्त्यालगत अस्वच्छता आढळून आली. ती तातडीने स्वच्छ करण्याचे काम सुरू करण्यात आले. तसेच, गणपती तलावातील वरवरचा गाळ काढण्याचे कामही पालिका मंगळवारपासून करेल, असे धोत्रे यांनी स्थानिक रहिवाशांना सांगितले. सध्या या तलावात प्रचंड निर्माल्य, कचरा व पाणवनस्पती पसरल्या आहेत. परंतु संपूर्ण तलावातील पाणी उपसून तो स्वच्छ करण्यावर मोठा खर्च अपेक्षित असल्याने या कामासाठी पालिकेला आर्थिक तरतूद करावी लागणार आहे. त्यामुळे केवळ वरवरचा गाळ काढून तलाव जुजबी स्वच्छ करण्यावरच हे काम मर्यादित राहणार आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/48MjMQAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬