[thane] - इमारतींसाठीचे उपोषण मागे

  |   Thanenews

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

सीवूड्स भागातील सिडकोनिर्मित धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर नागरिकांना न्याय मिळण्यासाठी गुरुवारपासून राष्ट्रवादीचे नगरसेवक विशाल डोळस यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यांच्यासोबत सीवूड्समधील नागरिकही या आंदोलनात सहभागी झाले होते. सोमवारी या उपोषणाची दखल घेत आमदार संदीप नाईक यांनी सिडको व्यवस्थापकीय संचालकांची भेट घेतली. यावेळी सिडकोच्या इमारतींची डागडुजी करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.

सीवूड्स येथे सिडकोने निर्माण केलेल्या निकृष्ट दर्जाच्या इमारतींची डागडुजी त्वरित सुरू करावी, धोकादायक घोषित झालेल्या घरांची सिडकोने स्वखर्चातून पुनर्बांधणी करून द्यावी, सीवूड्समधील नागरिकांसाठी सिडकोने संक्रमण शिबीर बांधून द्यावेत, इमारतींमधील दुर्घटनाग्रस्त जखमी नागरिकांना तसेच त्यांची झालेली वित्तहानी याची भरपाई करून द्यावी, सीवूड्स सेक्टर ४६, ४८, ४८ ए आणि ५० या ठिकाणी मार्केट, उद्याने, पार्किंग, मैदाने आणि रुग्णालय यांसारख्या सामाजिक सुविधांसाठी भूखंड उपलब्ध करून द्यावेत, अशा मागण्यांसाठी हे उपोषण सुरू करण्यात आले होते....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/azhunwAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬