[thane] - खड्डेभरणीला वेग

  |   Thanenews

म. टा. वृत्तसेवा, ठाणे

ठाणे महापालिका हद्दीतील कोपरी, नौपाडा, उथळसर, दिवा, मुंब्रा, कळवा, माजिवडा-मानपाडा, वर्तकनगर, लोकमान्य सावरकर आणि वागळे या ठिकाणच्या रस्त्यांवर ६ हजार ६०८ चौ. मी. क्षेत्रफळाचे सुमारे २३७४ खड्डे पडले आहेत. त्यापैकी ५ हजार ९९० चौ. मी. क्षेत्रफळाचे सुमारे दोन हजार १२२ खड्डे भरण्यात आल्याचा दावा पालिकेने केला आहे. उर्वरित खड्डे तात्काळ भरण्याचे आदेश पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत.

ठाणे शहरात होणारी 'ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन २०१८' आणि काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी शहरातील खड्डे तात्काळ भरण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शहरातील खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सोमवारी शहरातील कोरस रोड, यशोधन नगर, लोकमान्य नगर, म्हाडा वसाहत आदी ठिकाणी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. त्यानंतर पालिकेने खड्ड्यांबाबतची ही माहिती दिली आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/rcwJ8AAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬