[thane] - छाननीनंतरच ठेकेदारांना बिलांचे पैसे

  |   Thanenews

‌म. टा. वृत्तसेवा, वसई

वसई तालुक्यात जुलैमध्ये ठिकठिकाणी पावसात निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीला नालेसफाईची अपुरी कामे कारणीभूत असल्याचा आरोप पालिकेवर झाला होता. त्यामुळे नालेसफाईची कामे करणाऱ्या ठेकेदारांची बिले पालिकेकडून आतापर्यंत अदा करण्यात आलेली नाहीत. नालेसफाईचे काम कुठे व कसे केले, प्रभागनिहाय किती कामे करण्यात आली, किती गाळ काढला व कुठे टाकला याचा सविस्तर अहवाल मागविण्यात आला आहे. हा अहवाल आल्यानंतर त्याची छाननी होईल व तो स्थायी समिती सभेसमोर ठेवण्यात येईल. छाननीनंतरच ठेकेदारांना बिले देण्यात येतील, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

वसई तालुक्यात जुलै महिन्यात दोन दिवस विक्रमी पाऊस झाला. पावसाच्या पाण्याचा गटारे व नाल्यांमधून नीट निचरा न झाल्याने शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. पाणी निचरा करण्याची व्यवस्था कोलमडली. त्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. नालेसफाई झालीच नाही, नालेसफाईत भ्रष्टाचार झाला वगैरे आरोप त्यानंतर झाले. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी नाले नीट साफ झाले नव्हते व गाळही काढला गेला नव्हता, असे चित्र पाहायला मिळाले. शहारा अंतर्गत गटारेही साफ झाली न्हवती. त्यामुळे पालिका प्रशासनाचे दावे खोटे ठरले व पितळ उघडे पडले होते. पूरसदृश परिस्थिती येऊन गेल्यानंतर पालिकेला जाग आली व काही ठिकाणी पावसानंतर पुन्हा नाल्यांमधील गाळ काढला जात होता. गटारे स्वच्छ नाहीत व नाल्यांमधील गाळ पावसाआधी काढला गेला नव्हता, अशा तक्रारी लोकांनी पूरसदृश परिस्थितीनंतर पाहणी दरम्यान केल्या होत्या. तसेच नालेसफाईच्या कामाबाबतही विरोधकांनी आक्षेप घेतले होते....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/TavWiQAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬