[thane] - तीन अल्पवयीन मुलींचा विनयभंग

  |   Thanenews

म. टा. वृत्तसेवा, ठाणे

मुंब्र्यात एका व्यक्तीने तीन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी रविवारी मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे.

एका पीडित मुलीचे वय ८ वर्षे असून अन्य दोन मुली नऊ वर्षांच्या आहेत. या सर्व मुली मुंब्रा कौसा येथील एकाच इमारतीमध्ये राहतात. तर, आरोपी मोहमद शरीफ अन्सारी (५०) हाही याच इमारतीमध्ये राहतो. २३ ऑगस्ट रोजी दुपारी आरोपीने या मुलीसोबत गैरकृत्य केले. याबाबत एका मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे धाव घेत मुंब्रा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीनंतर आरोपी गायब झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे. अन्य पीडित मुलींचे अद्याप जबाब नोंदविण्यात आलेले नाहीत. याबाबत पोलिसांची चौकशी सुरू आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/MuKiPAAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬