[thane] - विहिगावचा ‘आदर्श’

  |   Thanenews

म. टा. वृत्तसेवा, ठाणे

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आर्दश गाव योजनेकडे अनेक खासदारांनी दुर्लक्ष केले असले तरी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी दत्तक घेतलेल्या शहापुरातील विहागावचे रुपडे या योजनेमुळे पालटले आहे. शहापूर तालुक्यातील विहीगावमधील ६८ कामांचे लोकार्पण नुकतेच पार पडले. या कामांमुळे आदिवासी वस्ती असलेल्या या गावातील आणि सभोवतालच्या पाड्यांतील चित्रच बदलत असून हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी या कामाचे कौतुक केले आहे.

या गावात बीएसएनएलचा मोबाइल टॉवर उभारण्यात आल्याने संदेश दळणवळण सुरू झाले, दऱ्याची वाडीसारख्या दुर्गम भागात डांबरी रस्ता झाला, गावांतील युवकांना रोजगार मिळावा म्हणून त्यांना सुरक्षा रक्षकांचे प्रशिक्षण, गांडूळखत प्रशिक्षण, माणुसकी महिला ग्राम संघ यांना कृषी अवजारे बँक योजनेचा लाभ देण्यात आला. यात ट्रॅक्टर, पॉवर ट्रीलर, भात कापणी व मळणी यंत्रे देण्यात आली. विहीगावच्या शाळेला डिजिटल शाळेचा दर्जा मिळाला असून नवीन वर्गखोल्याही मिळाल्या आहेत. याशिवाय 'मानव विकास'च्या माध्यमातून विविध शिबिरेही घेण्यात आली. जॉब कार्ड्स, जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, आधार कार्ड, शिधा पत्रिका, सात बारा उतारे ग्रामस्थांना देण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजनेतून एकूण १८ घरकुले याठिकाणी बांधून लाभार्थींना हस्तांतरित करण्यात आली. जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आरोग्य तपासणी करून १०० टक्के लसीकरण केले. अशोक धबधब्याला इको टुरिझम दर्जा मिळाल्याने गाव पर्यटनाचे व रोजगाराचे केंद्र होत आहे. या आराखड्यात विविध यंत्रणांनी मिळून १११ कामे हाती घेतली होती. अवघ्या काही महिन्यांत ६८ कामे पूर्ण झाली असून १५ कामे प्रगतिपथावर आहेत तर २८ कामे सुरू होणार आहेत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे 'लोकराज्य' हे मासिक या गावातील गावकऱ्यांसाठी वर्षभर दिले जाणार आहे. यामुळे विविध योजना व कार्यक्रम आणि सरकारचे निर्णय याची माहिती गावकऱ्यांना मिळणार आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/JbFB2QAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬