[ahmednagar] - चार वर्षांत वाढले ८८ हजार मतदार

  |   Ahmednagarnews

म. टा. प्रतिनिधी, नगर

निवडणूक विभागाने एक सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघातील ३३ लाख १८ हजार ५५५ मतदारांचा समावेश आहे. तर, २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडवणुकीत वापरण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये ३२ लाख २९ हजार ९४० मतदार होते. त्यामुळे गेल्या चार वर्षांत जिल्ह्यात ८८ हजार ६१५ मतदार वाढल्याचे स्पष्ट होत आहे. प्रारूप मतदार यादीवर हरकतींसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात एक जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्याअंतर्गत एक सप्टेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. लोकसभा निवडणूक २०१९ पूर्वीचा हा शेवटचा सखोल पुनरीक्षण कार्यक्रम असल्यामुळे जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघातील तीन हजार ७२२ मतदान केंद्रांवर ही यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रारूप मतदार यादीनुसार जिल्ह्यामध्ये ३३ लाख १८ हजार ५५५ मतदार आहेत. त्यामध्ये १७ लाख ३४ हजार ४९६ पुरुष मतदार तर १५ लाख ८३ हजार ९२५ स्त्री मतदार आहेत. १३४ तृतीयपंथी मतदारांची नावे यादीमध्ये सामाविष्ट आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/ANksuQEA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬