[ahmednagar] - ट्रान्सपोर्ट व्यवसायिकाचा आत्महत्येचा प्रयत्न

  |   Ahmednagarnews

सावंत यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार

म. टा. प्रतिनिधी, नगर

नगरमधील सावंत ट्रान्सपोर्टचे संचालक अभिजीत पंढरीनाथ सावंत (वय ४५, रा. गोंविदपुरा, नगर) यांनी चाँदबिबी महाल येथे जाऊन स्वतःच्या पिस्तूलमधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना एका खासगी हॉस्पिटमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. कोणत्या कारणामुळे सावंत यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, याबाबत पोलिस चौकशी करत आहेत.

सावंत यांचा ट्रान्सपोर्टचा मोठा व्यवसाय असून, नगरमधील मार्केट यार्ड येथे सावंत ट्रान्सपोर्ट नावाने कार्यालय आहे. बुधवारी दुपारी अभिजीत सावंत हे कार्यालयात होते. चारच्या सुमारास ते ड्राइव्हर अंबादास पवार याला घेऊन कारमधून चाँदबिबी महाल येथे गेले. तेथे ते एका झाडाखाली बसले होते. थोड्या वेळाने पवार याला दूर जाण्यास सांगितले. त्यानंतर आपल्या जवळील पिस्तूलमधून उजव्या कानाजवळ त्यांनी गोळी झाडली. त्याच्यावेळी फिरण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीने सावंत यांना जमिनीवर पडलेले पाहिल्यानंतर आरडाओरडा केला. सावंत यांचा ड्राइव्हर पवार त्यांच्याजवळ आला. त्याने ने फोन करून सावंत यांचे भाऊ सुजित सावंत यांना माहिती दिली. सुजित घटनास्थळी गेले होते. तोपर्यंत नगर तालुका पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक किरण शिंदे व इतर कर्मचारी घटनास्थळी गेले. जखमी अवस्थेत असलेल्या सावंत यांना तातडीने नगरमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आले. सावंत यांची प्रकृती नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/6UsDQgAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬