[ahmednagar] - पोलिसांवर कामाचा ताण

  |   Ahmednagarnews

पोलिस स्टेशनच्या विभाजनाचे प्रस्ताव पडून

म. टा. प्रतिनिधी, नगर

जिल्ह्याची लोकसंख्या आणि गुन्हे वाढत आहेत. मात्र, पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या आणि नव्या पोलिस स्टेशन्सची संख्या वाढताना दिसत नाही. गुन्हे वाढत असल्याने पोलिस कर्मचारी, अधिकारी यांच्यावरील कामाचा ताण वाढत असला तरी आठ नवीन पोलिस स्टेशनचे प्रस्ताव अनेक वर्षांपासून पडून आहेत. गेल्या सात वर्षांपासून ही पोलिस स्टेशन्स होण्यासाठी पोलिस अधीक्षकांकडून पाठपुरावा करण्यात येत असला तरी त्याला अद्याप यश आलेले नाही.

नगर जिल्हा संवेदनशील असून, सातत्याने गंभीर गुन्हे घडतात. जिल्ह्यातील तीस पोलिस स्टेशन्सला दरवर्षी पाच हजारांहून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद होते. या गुन्ह्यांचा तपास करणे, सण उत्सव, निवडणुकांचा बंदोबस्त पोलिसांना करावा लागतो. संख्याच कमी असल्याने पोलिस कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येतो. तर पोलिस स्टेशनचे अंतर दूर असल्याने घटनास्थळी जाणे, नागरिकांना पोलिस स्टेशनला येणे गैरसोयीचे होत आहे. त्यामुळे नगर शहरातील दोन, ग्रामीण भागातील सहा पोलिस स्टेशन्सचे विभाजन करून नवीन आठ नवीन पोलिस स्टेशन्स मंजूर करावीत, यासाठी प्रस्ताव देण्यात आलेले आहेत. नगर शहराच्या हद्दीसाठी कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प अशी तीन पोलिस ठाणी आहेत. त्यात कोतवाली, तोफखाना या दोन पोलिस स्टेशनच्या विभाजनाची गरज आहे. तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत मुख्य शहरातील काही संवेदनशील भाग, सावेडी उपनगर, बोल्हेगाव असा परिसर असून, हद्दीत तब्बल एक लाख ३५ हजार लोकसंख्या आहे. या भागात घरफोड्या, चेनस्नॅचिंग करणे असे गुन्हे जास्त घडत आहेत. जवळच एमआयडीसी असल्याने या भागात नव्याने वस्ती वाढली आहे. त्या भागात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. या भागात पोलिसांची नियमित गस्त होत नाही. त्यामुळे तोफखाना पोलिस ठाण्याचे विभाजन करून सावेडीसाठी स्वतंत्र्य पोलिस स्टेशन निर्माण करण्याचा प्रस्ताव २०१३ मध्ये तत्कालील पोलिस अधीक्षकांनी पोलिस महासंचालकांना दिला होता. हा प्रस्ताव अद्याप पडून आहे. तर कोतवाली पोलिस ठाण्याच्या विभाजनाचा प्रस्ताव २०११ पासून प्रलंबित आहे. कोतवाली पोलिस ठाण्यापासून केडगाव उपनगर दूर आहे. त्यामुळे केडगाव येथे स्वतंत्र्य पोलिस ठाणे करण्याचा प्रस्ताव होता. त्याचबरोबर पाथर्डी, राहुरी, कर्जत, जामखेड तालुक्यांसाठी प्रत्येकी एकच पोलिस स्टेशन असून, राहुरीला देवळालीप्रवरा, शेवगावला बोधेगाव, कर्जतला मिरजगाव, जामखेड तालुक्यात खर्डा येथे नवीन पोलिस स्टेशन करण्यासाठी प्रस्ताव देण्यात आले आहेत. गेल्या सात वर्षांत तीन पोलिस अधीक्षक बदलून गेले आहेत. त्यांच्या काळात पोलिस स्टेशन्स मंजूर होण्याबाबत पाठपुरावा झाला आहे. सध्याचे पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा हे ही नवीन पोलिस स्टेशनसाठी प्रयत्न करत आहे. परंतु पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या प्रस्ताव तसेच पडून आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/PmvJuwAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬