[ahmednagar] - 'बीएसएनएल'मध्ये हिंदी पंधरवाडा

  |   Ahmednagarnews

म. टा. प्रतिनिधी, नगर

बीएसएनएल कार्यालयात हिंदी पंधरवाडा साजरा करण्यात येत असून यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गायक पवन नाईक यांच्या हस्ते या उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. बीएसएनएलचे मुख्य महाव्यवस्थापक अजातशत्रु सोमानी हे अध्यक्षस्थानी होते.

भारतीय संगीतातील विविध रचनेतील हिंदी भाषेचे महत्त्व पवन नाईक यांनी सांगितले. 'कला ही भाषा, देश, सीमा, संस्कृती पार करून रसिकांच्या हृदयात स्थान निर्माण करीत असते. परदेशात सुद्धा भारतीय संगीताला दाद मिळत असून दोन देशात संगीत मित्राचे नाते निर्माण करते,' असेही नाईक यांनी सांगितले. यावेळी त्यांनी हिंदी गझल, सुफी गीत यातील बारकावेही स्पष्ट केले. सोमानी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी अधिकाऱ्यांसाठी राजभाषा प्रश्नमंच स्पर्धा घेण्यात आले. स्पर्धेमधील विजेत्यांचा नाईक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला उप महाव्यवस्थापक एम. यू. खान, विजय पवार, ए. बी. क्षीरसागर, भानुदास महानूर, राजभाषा अधिकारी विजय नगरकर, समीर मल्लेभरी, यशस्वी बजाज, शिवाजी तांबे, शंकर घुगे, राजेंद्र नागे, विजय पिंपरकर, डी. यू. ढुमने यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/o9W_jAAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬