[ahmednagar] - मंडप परवानगीसाठी कार्यकर्त्यांची लगबग

  |   Ahmednagarnews

म. टा. प्रतिनिधी, नगर

गणेशोत्सव अवघ्या आठ दिवसांवर आल्याने मंडपाची परवानगी घेण्यासाठी महापालिकेतील 'एक खिडकी'कक्षामध्ये गणेश मंडळांची गर्दी होऊ लागली आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये या कक्षामध्ये एकूण १२० गणेश मंडळांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी बुधवारी रात्री उशीरापर्यंत चाळीस मंडळांना परवानगी देण्यात आली होती.

गणेशोत्सवासाठी उभारण्यात आलेल्या परवानगी नसलेल्या मंडपांवर महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणीही मंडप उभारू नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच सोमवारी शिवसेनेच्या नेता सुभाष तरुण मंडळाने उभारलेला विनापरवाना मंडप महापालिकेच्या पथकाने जेसीबीने पाडून टाकला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मंडळाप्रमाणे आपल्या मंडळावर कारवाई होऊ नये, यासाठी गणेश मंडळांनी सावध भूमिका घेतली असून मंडपासाठी परवानगी घेण्यासाठी त्यांची धावपळ सुरू झाली आहे. महापालिकेच्या एक खिडकी कक्षामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मंडपाच्या परवानगीसाठी येणाऱ्या अर्जांच्या संख्येत वाढ झाली आहे. बुधवारअखेर या कक्षामध्ये १२० गणेश मंडळांनी अर्ज केले असून हे अर्ज निकाली काढण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/d5mqQQAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬