[ahmednagar] - शाळांचा दर्जा उंचावतोय

  |   Ahmednagarnews

म. टा. प्रतिनिधी, नगर

'जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये राबवण्यात येणाऱ्या नावीन्यपूर्ण उपक्रमांतून जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा उंचावला आहे. या शाळांमधील अप्रगत विद्यार्थ्यांसाठी जादा तास, मुलांसाठी आनंदनगरी, बालमेळा असे उपक्रम इतर जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक आहेत,' असे प्रतिपादन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.'विद्यार्थ्यांप्रती असलेली शिक्षकांची बांधिलकी ही कौतुकास्पद आहे. चांगला माणूस घडवण्याचे काम शिक्षकांचे आहे. या जबाबदारीची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांच्या विकासासाठीची त्यांची धडपड दिसून येते,' असे मत मांडतानाच त्यांनी शिक्षकांचे कौतुक केले.

जिल्हा परिषदेच्या वतीने दिले जाणारे 'जिल्हा शिक्षक पुरस्कार' पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते पंधरा शिक्षकांना प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील, उपाध्यक्षा राजश्री घुले, बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे, अर्थ व बांधकाम विभागाचे सभापती कैलास वाघचौरे, कृषी सभापती अजय फटांगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने, राजेश परजणे, शिवाजी गाडे, प्रभावती ढाकणे, राहुल झावरे, अनुसया होन, बाळासाहेब लटके, जितेंद्र मेटकर उपस्थिती होती....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/ji1JpAAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬