[ahmednagar] - शिवसेनेने उडवली राजकीय खळबळ

  |   Ahmednagarnews

नगरसेवक बोराटे, कावरे व लोंढे शिवबंधनात

म. टा. प्रतिनिधी, नगर

महापालिका निवडणूक जशी जवळ येऊ लागली, तसे नगरच्या राजकीय विश्वात रोज नवे धमाके होऊ लागले आहेत. भाजपने शिवसेनेचे नगरसेवक मनोज दुलम यांना गळाला लावल्यानंतर बुधवारी सेनेने भाजपचे महापालिकेतील गटनेते दत्ता कावरे यांनाच फोडून परतफेड केली. शिवाय हे करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे व काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक सुभाष लोंढे यांनाही शिवबंधनात अडकवून नगरमध्ये राजकीय खळबळ उडवून दिली. या तीन विद्यमान नगरसेवकांसह नागापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता सप्रे, मनसेचे माजी शहर प्रमुख गिरीश जाधव व उद्योजक सुमित कुलकर्णी यांनाही सेनेत घेऊन राजकीय चर्चेला उधाण आणले आहे.

नगर महापालिकेची निवडणूक येत्या डिसेंबरमध्ये होणार आहे. त्यासाठीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. ३४ वॉर्डांचे निम्मे म्हणजे १७ होताना अनेक वॉर्डांची मोडतोड झाली आहे. अनेक आजी-माजी नगरसेवकांचे हक्काचे भाग इकडे-तिकडे गेल्याने निवडणुकीची राजकीय समीकरणे बदलली आहेत. सगळीकडेच राजकीय पक्षांच्या उमेदवारांना एकमेकांच्या साथीने लढावे लागणार असून, एकमेकांची हक्काची मते मिळवून सर्वांनी मिळून महापालिकेच्या दिशेचा सुपंथ धरावा लागणार आहे. त्यामुळेच एकमेकांचे ताकदवान नगरसेवक फोडण्यासह नवे चेहरे जवळ घेण्याचे काम भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या शहरातील तीनही पक्षांनी सुरू केले आहे. भाजनपे यात आघाडी घेताना शिवसेनेचे नगरसेवक मनोज दुलम व माजी आमदार अनिल राठोड यांचे कट्टर समर्थक विजय बोरुडे यांना पक्षात घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनेही काही माजी नगरसेवकांना आपल्यात घेऊन पावन करून घेतले आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी मात्र शिवसेनेने शहरातील सर्वच मातब्बर पक्षांना दणका देताना त्यांचे ताकदवान उमेदवारच शिवबंधनात बांधून घेतले आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/PUXFBAAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬