[aurangabad-maharashtra] - आ. कदमांच्या पुतळ्याला मारले जोडे

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी दहीहंडी महोत्सवामध्ये तरुणीला पळवून नेण्याची गुंडगीरीची भाषा वापरली, त्याबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेस व महिला काँग्रेसने बुधवारी कदम यांच्या पुतळ्यास साडी नेसवून, बांगड्या घालून जोडे मारो आंदोलन केले.

मुख्यमंत्र्यांनी राम कदम यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यानंतर महिलांबद्दल जर कुणी अपमानास्पद बोलण्याचा प्रयत्न केला, तर त्याला महाराष्ट्रामध्ये फिरू दिले जाणार नाही. राम कदम यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा भाजपच्या कोणत्याही नेत्याला औरंगाबाद जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी राष्‍ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दत्ता भांगे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षना सलगर, जिल्हाध्यक्षा अनुपमा पाथ्रीकर, महिला शहर अध्यक्षा मेहराज पटेल तसेच प्रतिभा वैद्य, अमोल दांडगे, दीपक बहीर, दिनेश नवगिरे, धनंजय मिसाळ, अमोल साळवे, जुबेर खान, अब्रार पटेल, आदींची उपस्थिती होती.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/pSm9uQAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬