[aurangabad-maharashtra] - आ. राम कदमांविरोधात मनसेची निदर्शने

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भारतीय जनता पार्टीचे आमदार राम कदम यांच्या वक्तव्याचा निषेध करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बुधवारी दुपारी क्रांतीचौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी डोक्याला मुंडावळी बांधत राम कदम यांनी विवाहसंस्था काढावी, असा संदेश देत अनोखा विरोध दर्शवण्यात आला.

सोमवारी दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये राम कदम यांनी मुंबईत मुली पळवण्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. आ. कदम लोकप्रतिनिधी असून त्यांनी केलेले वक्तव्य अशोभनीय आहे. कदम यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. आ. कदम यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला. तसेच महिला पदाधिकाऱ्यांनी कदम यांच्या फोटोला चप्पल मारा आंदोलन केले. देशात बेटी बचाव बेटी पढाओ अभियान सुरू असताना आ. कदम यांचे बेटी भगाव अभियान सुरू असल्याचा आरोपही मनसेच्या वतीने करण्यात आला. या आंदोलनामध्ये जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, बिपीन नाईक, संदीप कुलकर्णी, वैभव मिटकर, सतनामसिंग गुलाटी, गजन गौडा पाटील, आशिष सुरडकर, राजू जावळीकर, प्रवीण मोहिते, अॅड. निनाद खोचे, निखिल ताकवले, शुभम नवले, किशोर साळवे, मंगेश साळवे यांची उपस्थिती होती....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/vsD9PAAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬