[aurangabad-maharashtra] - नोकरीच्या आमिषाने गंडा घालणारा अटकेत
म. टा. प्रतिनिधी,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिपाईपदावर नोकरी लावण्याचे आमfष दाखवून पाच लाखांचा गंडा घातल्याप्रकरणातील आरोपी प्रल्हाद अर्जून काळे याला शुक्रवारपर्यंत (७ सप्टेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी गजला अल अमोदी यांनी दिले.
या प्रकरणी मजुरी काम करणारे सचिन सूर्यभान पाचकर (३७, रा. हडको) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीची सासू मनीषा साहेबराव वैद्य यांची ओळख आरोपी रंजना बाळासाहेब जगदाळे हिच्याशी झाली होती. दरम्यान, आरोपी रंजना तसेच तिचा पती व आरोपी बाळासाहेब जगदाळे यांनी मनीषा वैद्य यांना आपल्या घरी बोलावले होते. या वेळी, 'मी विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागात वरिष्ठ लिपिक असून, विद्यापीठात शिपाईपदावर नियुक्त्या होणार आहेत. कोणी नातेवाईक असल्यास सांगावे. मात्र त्यासाठी दहा लाख रुपये लागतील', असे रंजना हिने वैद्य यांना सांगितले होते. त्यानंतर फिर्यादीने आरोपी बाळासाहेब जगदाळे याला १० जून २०१५ रोजी पाच लाख रुपये दिले होते. उर्वरित पाच लाख रुपये ताबडतोब द्या, असेही जगदाळे याने फिर्यादीला त्यावेळी सांगितले होते. फिर्यादीने पाच लाख रुपये दिल्यानंतर आरोपीने फिर्यादीला विद्यापीठाच्या लेटरहेडवर शिपाईपदाचे नियुक्तीपत्र दिले होते. त्याचवेळी शिपाईपदासाठी १७, तर कनिष्ठ लिपिक पदासाठी ९ जणांची यादीदेखील आरोपीने फिर्यादीला दाखविली होती. मात्र, संबंधित नियुक्तीपत्र बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील सहआरोपी प्रल्हाद अर्जुन काळे (ह.मु. जायकवाडी प्रकल्प, ता. गेवराई. जि. बीड) हा कोर्टात शरण आल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली....
येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/2OlFsQAA