[aurangabad-maharashtra] - ‘पीडी’च्या सहाय्याने २२ लाख किडनी रुग्णांना जगवणे शक्य

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

देशातील १३५ कोटी जनतेपैकी २३ कोटी देशवासियांना कोणत्या ना कोणत्या प्रकारचा किडनी विकार आहे. त्यातील २३ लाख रुग्ण 'डायलिसिस'शिवाय जगू शकत नाहीत. मात्र, त्यातील केवळ एक लाख रुग्णांनाच 'हिमोडायलिसिस'ची सुविधा फक्त शहरांमध्येच उपलब्ध आहे. त्याचवेळी 'हिमोडायलिसिस'ला समर्थ पर्याय असलेल्या व रुग्ण स्वतः घेऊ शकणाऱ्या 'पेरिटोनिअल डायलिसिस'विषयी ना जनजागृती आहे ना कुठल्या शासकीय योजनेचा आधार आहे; म्हणूनच व्यापक जनजागृती व सर्वस्तरीय मंथन घडवून आणण्यासाठी 'पेरिटोनिअल डायलिसिस'वर शहरात राष्ट्रीय परिषद होत असल्याचे बुधवारी पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

पेरिटोनिअल डायलिसिस सोसायटी ऑफ इंडिया, नेफ्रॉलॉजी सोसायटी, औरंगाबाद युरॉलॉजी सोसायटीच्या सहकार्याने ही परिषद सात ते नऊ सप्टेंबर दरम्यान हॉटेल ताज येथील 'विवांटा' येथे होणार आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महापौर नंदकुमार घोडेले, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (७ सप्टेंबर) सायंकाळी साडेसहाला परिषदेचे उद्घाटन होणार आहे. याच राष्ट्रीय परिषदेतून 'पेरिटोनिअल डायलिसिस'विषयी (पीडी) व्यापक प्रमाणात जगजागृती केली जाणार आहे. सद्यस्थितीत ग्रामीण भागातच नव्हे तर अगदी तालुका पातळीवरही 'हिमोडायलिसिस'ची (एचडी) कुठलीही सोय नाही व त्यासाठी लागणारी उपकरणेही ग्रामीण भागात नाहीत. या स्थितीत 'पेरिटोनिअल डायलिसिस'द्वारे रुग्ण हा स्वतः स्वतःचे डायलिसिस करून घेऊ शकतो. मात्र त्यासाठी सुरुवातीला लागणारा २५ हजारांचा खर्च व मासिक १५ ते २० हजारांचा खर्च बहुसंख्य रुग्णांना करणे शक्य होत नाही आणि 'डायलिसिस'शिवाय रुग्णांची झपाट्याने मृत्युकडे वाटचाल सुरू होते. ज्याप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत 'एचडी' होते, तसेच 'पीडी'लादेखील ही सुविधा उपलब्ध झाली, तर अशा प्रकारच्या अधिकाधिक रुग्णांना जगवणे शक्य होऊ शकेल. त्यामुळे 'महात्मा फुले' किंवा 'आयुष्यमान भारत' योजनेमध्ये 'पीडी'चा समावेश होण्यासाठी जनरेटा वाढावा, या हेतुसह परिषदेमध्ये विविध शास्त्रीय दृष्टिकोनातून मंथन होणार आहे आणि त्यासाठी देश-विदेशातील तज्ज्ञ परिषदेत सहभागी होणार आहेत, असे परिषदेच्या संयोजन समितीचे सचिव डॉ. सुहास बावीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी मूत्रपिंडविकारतज्ज्ञ डॉ. समीर महाजन, डॉ. श्रीकांत देशमुख आदींची उपस्थिती होती....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/wnfzewAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬